मुंबई, दि.11 ऑक्टोबर (प्रतिनिधि) : बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांचा आज जन्मदिवस आहे. ते 80 वर्षांचे झाले आहेत. बिग बींच्या बर्थनिमित्त त्यांना सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तर महानायक अमिताभ बच्चनच्या जन्मदिवशी त्यंच्या चाहत्यांना रिर्टन गिफ्ट ही मिळालं आहे. हे गिफ्ट म्हणजे गुडबायच्या मेकर्सने प्रेक्षकांसाठी चित्रपटाचे तिकीट फक्त 80 रुपयांना ठेवले आहे.
इंस्टाग्रामवर बालाजी मोशन पिक्चर्सच्या एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘बिग बी उद्या 80 वर्षांचे होतील. त्यामुळे ग्रॅंड सेलिब्रेशन व्हायला हवे. त्याचा 80 वा वाढदिवस, त्यांच्या चाहत्यांसोबत त्यांचा नवीन चित्रपट गुडबाय त्याच्या कुटुंबासह जवळच्या सिनेमा गृहांमध्ये पाहून साजरा करा. 11 ऑक्टोबर 2022 रोजी चित्रपटाचे तिकीट फक्त 80 रुपयांना असेल, तुमची तिकिटे आत्ताच बुक करा: Bio मध्ये लिंक!”
बिग बींच्या वाढदिवसाला चाहत्यांनी त्यांचा नवा चित्रपट पाहण्यासाठी नक्कीच थिएटरमध्ये पोहोचावं अशी चित्रपट निर्मात्यांची इच्छा आहे. अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना यांचा ‘गुडबाय’ चित्रपट 7 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या फॅमिली ड्रामा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी काहीही कमाल दाखवली नाही. त्याचवेळी, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी थोडी उडी घेतली. चित्रपटाने दुस-या दिवशी १.५ कोटींची कमाई केली आहे. ओपनिंग डेच्या तुलनेत तो चांगला असला तरी या चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.
