ठाणे, दि. 13 : मेट्रो मार्ग 4 च्या पिलरवर आनंदनगर सिग्नल कट ते वाघबीळ नाका पावेतो घोडबंदर रोड या ठिकाणी गर्डर टाकण्याच्या कामामुळे दि. 16 ऑक्टोबर 2022 रोजी रात्रौ 23.55 वा. ते दि. 27 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 04.00 वाजे पर्यंत या कालावधीत घोडबंदर रोडकडून ठाणेकडे जाणाऱ्या वाहिनी जडअवजड वाहनांसाठी वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त दत्तात्रय कांबळे यांनी कळविली आहे.
वाहतूकीत बदल पुढील प्रमाणे
प्रवेश बंद – गुजरात महामार्गाने ठाणे घोडबंदर रोडच्या दिशेने येणा-या सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
प्रवेश बंद – मुंबई, वसई, विरार कडुन घोडबंदर रोडच्या दिशेने येणा-या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना फाउंटन हॉटेल जवळ प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – गुजरात, मुंबई, विरार, वसई, कडून घोडबंदर रोडच्या दिशेने येणारी सर्व प्रकारची जड अवजड वाहने ही चिंचोटी नाका येथून कामण अंजुरफाटा – माणकोली भिवंडी मार्ग इच्छित स्थळी जातील.
जड अवजड वाहने सोडून इतर वाहने ही आनंदनगर सिग्नल कट जवळ डावे बाजुस वळण घेवून सेवा रस्त्याने पुढे विजय गार्डन सिग्नल किंवा वाघबीळ नाका जवळ उजवे वळण घेवून मुख्य रस्त्यास मिळून पुढे इच्छित स्थळी जातील.
