ठाणे दि.13 :- ठाणेप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे वाहन या संगणक प्रणालीवर परिवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहनांसाठी सध्या सुरु असलेली मालिका MH-04-LG ही मालिका संपल्यानंतर तात्काळ नविन मालिका MH-04-LJ सुरु करण्यात येणार आहे. आकर्षक व पसंतीच्या वाहन नोंदणी क्रमांकासाठी अर्ज दि. 14 ऑक्टोबर 2022 पासून स्विकारुन पसंतीचे व आकर्षक क्रमांक विहीत शुल्क आकारुन आरक्षित करण्यात येतील, असे ठाणे सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद नलवडे यांनी कळविले आहे.
