ठाणे दि.14 :सामाजिक न्याय विभागाच्या स्थापना दिनानिमित्त उद्या दि.15 ऑक्टोबर रोजी ऐरोली येथील दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनियरींग येथे दुपारी 01.00 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी दिली आहे.
समाजामध्ये मानाचे स्थान नसणाऱ्या व कायमच समाज सुधारणांपासून वंचित व मागास राहिलेल्या समाजाला न्याय देण्यासाठी बॅकवर्ड क्लास वेलफेअर डिपार्टमेंटची स्थापना दि. 15 ऑक्टोंबर, 1932 रोजी करण्यात आली. या विभागाला 90 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्त राज्यभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.ठाणे जिल्हयातील कार्यक्रम नवी मुंबईतील ऐरोली येथील दत्ता मेघे महाविद्यालयात होणार आहे.
