नवी दिल्ली :15 ऑक्टोबर (प्रतिनिधी) : भारताने
आण्विक पाणबुडी INS अरिहंतवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. अनेक देशांकडून बॅलेस्टिक आणि आण्विक क्षेपणास्त्रांची चाचणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी योग्य तयारी असणे आवश्यक आहे. असे संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे. हे भारतासाठी एक महत्त्वाचं आणि मोठं पाऊल आहे.
भारताने 14 ऑक्टोबर रोजी बॅलेस्टिक मिसाईल टेस्ट केली, जी यशस्वी ठरली. विशेष म्हणजे INS अरिहंत वरून चाचणी करण्यात आलेल्या क्षेपणास्त्राची पहिल्यांदाच संरक्षण मंत्रालयाने अधिकृत माहिती दिली आहे.
INS अरिहंत 2009 मध्ये लाँच करण्यात आली होती. त्यानंतर 2016 मध्ये INS अरिहंत नौदलाच्या सेवेत रुजू झाली. मात्र INS अरिहंतच्या आतापर्यंतच्या कार्य काळात कोणत्याही चाचणीची माहिती देण्यात आली नव्हती. INS अरिहंतबाबत नौदलाने नेहमीच गोपनियता बाळगली आहे.
