17 ऑक्टोबर(प्रतिनिधी)
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या PM किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना आज मोठी बातमी मिळणार आहे. आज PM मोदी 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 2-2 हजार रुपये ट्रान्सफर करणार आहेत. हे पैसे लाभार्थ्यांना पीएम किसानच्या 12 व्या हप्त्याच्या रूपात दिले जातील.
यापूर्वी, ऑगस्ट ते नोव्हेंबर 2021 मध्ये 9 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता हस्तांतरित करण्यात आला होता. 17 ऑक्टोबर रोजी भारतीय कृषी संशोधन संस्था (ICAR), पुसा येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांसाठी 12 वा हप्ता जारी करतील, असे कृषी मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
पंतप्रधान डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात 16,000 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करतील. कृषी मंत्रालयाकडून सांगण्यात आले की 17 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी ‘पीएम किसान सन्मान संमेलन 2022’ या दोन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. यादरम्यान ते शेतकरी आणि कृषी स्टार्टअप्स, संशोधक, धोरणकर्ते, बँकर्स आणि इतर भागधारकांना संबोधित करतील.
ई-केवायसी न करणाऱ्यांना या वेळी १२व्या हप्त्याचे पैसे पाठवले जाणार नाहीत, असे सरकारने आधीच स्पष्ट केले आहे. तुम्ही तुमचे ई-केवायसी पूर्ण केले नसेल, तर ते लवकर करा. 31 मे 2022 रोजी सरकारने जारी केलेले 2000 रुपये तुम्हाला मिळू शकले नाहीत, तर यावेळी 17 ऑक्टोबर (सोमवार) तुमच्या खात्यात 4000 रुपये येतील.
