शहापूर, मुरबाड दि. 23 ऑक्टोबर : “समता मानव सेवा संस्थेच्या” माध्यमातून शहरी, ग्रामीण, दुर्गम भागात सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व आरोग्य सेवा यासारखे उपक्रम राबवित आलेली आहे व राबवते याचाच भाग म्हणून दीपावली उत्सव निमित्ताने पुढे येणाऱ्या उन्हाळ्याची जाणीव समजून दी भिमाई क्रेडिट सोसायटी लिमि. मुख्य प्रवर्तक मा. राजेश पवार यांच्या सहकार्याने ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात ग्रामीण आदिवासी भागात टेपाचीवाडी, तोंडलीवाडी, न्हवे सासणे याठिकाणी शेकडो गरजू लहान थोर व्यक्तींना शैक्षणिक साहित्य व मानवी उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
सामजिक कार्यकर्ते दिलीप धनगर यांनी आपले व्यक्त करताना संस्थेच्या सामाजिक जबाबदारी विषयी बोलताना संस्थेच्या माध्यमातून होत असलेल्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, संस्थेच्या महारष्ट्र महासचिव श्रीमती सुजाता सोंडकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, संस्थेच्या माध्यमातून भविष्यात आपण आपल्या सहकार्याने याभागात ठोस उपक्रम राबवून एक नवी दिशा देण्याचे कार्य करू.पुढे राजेशजी पवार यांनी पूर्व इतिहासाची आठवण देवून चप्पल वाटप करण्याचा उद्देश सांगताना सर्वसामान्य व्यक्ती पायात चप्पल केंव्हा, कधी व का वापरावी याबाबत विस्तृत माहिती दिली.
नंतर संस्थापक अध्यक्ष धनाजी सुरोसे यांनी संस्थेच्या कार्याविषयी बोलताना संस्थेची स्थापना २०१५ पासून आजपर्यंत केलेल्या कामाची पार्श्वभूमी समजून सांगितली आणि म्हणाले की संस्थेच्या नावात समता शब्दा आहे जो आम्ही राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या विचारांना प्रेरित होऊन कार्य करीत आहोत. ही जी आम्ही मदत करित आहोत हे उपकार म्हणून नव्हे तर प्रत्येक व्यक्तीने आपली सामजिक जबाबदारी समजून आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो आहे म्हणून हा सारा प्रपंच. जमलेल्या सर्व बांधवांना दिवाळी निमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात संस्थेच्या महाराष्ट्र महिला अध्यक्षा श्रीमती मनीषा बेलोसे, सदस्या प्रिया वाघेरे, महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे मुरबाड तालुका अध्यक्ष मा.अदिक भवार, दी भिमाई मागासवर्गीय क्रेडिट सोसायटीचे पदाधिकारी मा.विजय खोलंबे, दयानंद रातांबे श्रीमती स्वातीताई धनगर, आदी मान्यवर उपस्थितीत होते.
शेवटी कार्यक्रमाचे आयोजक नितीन खंडागळे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला आहे असे जाहीर केले.
शहापूर, मुरबाड, दि. २३ ऑक्टोंबर २०२२ : समता मानव सेवा संस्थेच्या माध्यमातून शहरी, ग्रामीण, दुर्गम भागात सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व आरोग्य सेवा यासारखे उपक्रम राबवित आलेली आहे व राबवते याचाच भाग म्हणून दीपावली उत्सव निमित्ताने पुढे येणाऱ्या उन्हाळ्याची जाणीव समजून दी भिमाई क्रेडिट सोसायटी लिमि. मुख्य प्रवर्तक मा. राजेश पवार यांच्या सहकार्याने ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात ग्रामीण आदिवासी भागात टेपाचीवाडी, तोंडलीवाडी,न्हवे सासणे याठिकाणी शेकडो गरजू लहान थोर व्यक्तींना शैक्षणिक साहित्य व मानवी उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. सामजिक कार्यकर्ते दिलीप धनगर यांनी आपले व्यक्त करताना संस्थेच्या सामाजिक जबाबदारी विषयी बोलताना संस्थेच्या माध्यमातून होत असलेल्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,संस्थेच्या महारष्ट्र महासचिव श्रीमती सुजाता सोंडकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, संस्थेच्या माध्यमातून भविष्यात आपण आपल्या सहकार्याने याभागात ठोस उपक्रम राबवून एक नवी दिशा देण्याचे कार्य करू.पुढे राजेशजी पवार यांनी पूर्व इतिहासाची आठवण देवून चप्पल वाटप करण्याचा उद्देश सांगताना सर्वसामान्य व्यक्ती पायात चप्पल केंव्हा, कधी व का वापरावी याबाबत विस्तृत माहिती दिली.नंतर संस्थापक अध्यक्ष धनाजी सुरोसे यांनी संस्थेच्या कार्याविषयी बोलताना संस्थेची स्थापना २०१५ पासून आजपर्यंत केलेल्या कामाची पार्श्वभूमी समजून सांगितली आणि म्हणाले की संस्थेच्या नावात समता शब्दा आहे जो आम्ही राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या विचारांना प्रेरित होऊन कार्य करीत आहोत. ही जी आम्ही मदत करित आहोत हे उपकार म्हणून नव्हे तर प्रत्येक व्यक्तीने आपली सामजिक जबाबदारी समजून आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो आहे म्हणून हा सारा प्रपंच. जमलेल्या सर्व बांधवांना दिवाळी निमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात संस्थेच्या महाराष्ट्र महिला अध्यक्षा श्रीमती मनीषा बेलोसे, सदस्या प्रिया वाघेरे, महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे मुरबाड तालुका अध्यक्ष मा.अदिक भवार, दी भिमाई मागासवर्गीय क्रेडिट सोसायटीचे पदाधिकारी मा.विजय खोलंबे, दयानंद रातांबे श्रीमती स्वातीताई धनगर, आदी मान्यवर उपस्थितीत होते. शेवटी कार्यक्रमाचे आयोजक नितीन खंडागळे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला आहे असे जाहीर केले.
शेवटी कार्यक्रमाचे आयोजक नितीन खंडागळे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला आहे असे जाहीर केले.
