ठाणे, दि. 3 नोव्हेंबर (प्रतिनिधि -भाग्यश्री रासने) :
कल्याण तालुक्यातील वाहोली ग्रामपंचायतला अखेर वीस वर्षानंतर सरपंच मिळाला आहे. सरपंचपदी शाहीम सरवले हे विजय झाले आहेत. या गावात जनगणनेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने गावकऱ्यांनी 20 वर्षे मतदानावर बहिष्कार टाकला होता.
अखेर सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत ग्रामविकास या पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात निवडणुका लढवल्या आहेत. एकूण सात सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत पाच सदस्य बिनविरोध निवडून आले तर दोन जागी निवडणुका पार पाडल्या.
आता या ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता आल्याची चर्चा सुरू आहे. वीस वर्षे रखडलेला विकासाला चालना देणारा असल्याचा सरपंच शाहीम यांनी सांगितले.
