मुंबईः26 ऑक्टोबर (प्रतिनिधी) :मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे हे येत्या काही दिवसांत अयोध्याला जाणार आहेत. ते आपल्या सर्व आमदारांना घेऊनच अयोध्याचा दौरा करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
या दौऱ्याचे नियोजन सुरू असल्याचे बोलले जात आहे. आगामी काळात मुंबई, इतर महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे हा दौऱ्या ते करणार असल्याचे बोलले जात आहे. अयोध्येतील हनुमान गढीचे प्रमुख महंत राजूदास महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यांनी शिंदे यांना प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला येण्याचे निमंत्रण दिलं होते. हे निमंत्रण मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वीकारले होते.
शिंदे गटाचे मंत्री, आमदार हे ही अयोध्याला जाणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात ते अयोध्याचा दौरा करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्याला गेले होते. आता शिंदेही मुख्यमंत्री झाल्या नंतर अयोध्याला जाणार आहेत.
शिवसेनेचे चिन्ह व नाव गोठविल्यानंतर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव मिळाला आहे. त्यामुळे बाळासाहेबांसारख्ये आमचे हिंदुत्व असल्याचे शिंदे गटाकडून सांगण्यात येऊ शकते. तसेच मुंबईसह इतर महानगरपालिकांच्या निवडणुका येत्या काही दिवसांत जाहीर होतील, त्यामुळे हा दौरा महत्त्वाचा आहे.
