मुंबई : 26 ऑक्टोबर (प्रतिनिधी) : गेल्या कित्येक
दिवसांपासून शिवसेना कोणाची हा वाद न्यायालयात निकालाची प्रतिक्षेत आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या गटामध्ये रस्सीखेचमध्ये निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे.
दरम्यान खरी शिवसेना आमचीच हे सिद्ध करण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटांनी न्यायालयात पुराव्यासाठी विविध कागदपत्रे सादर केली आहे. पक्षाच्या लाखो सदस्यांमार्फत पाठिंब्याची प्रतिज्ञापत्रे जमा केली जात आहेत.
यामध्ये ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे ११ लाख प्रतिज्ञापत्र जमा केली होती. मात्र, ठाकरेंच्या गटाने आयोगाला पाठवलेल्या प्रतिज्ञापत्रांपैकी जवळपास अडीच लाख प्रतिज्ञापत्र आयोगाने ठरवून दिलेल्या फॉरमॅटमध्ये नसल्याने निरुपयोगी ठरणार असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे ही कागदपत्र आता जमा करुन देखील निरोपयोगी ठरल्याने ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. तर यामध्ये ठाकरे गट कीतपत यशस्वी ठरतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
