
मुंबई, विलेपार्ले दि. 26 ऑक्टोबर : बळी पहाट- शोध इतिहासाचा, सत्य सांस्कृतीचा… ह्या बहुचर्चित कार्यक्रमाला मुंबईत समाज बांधवांची प्रचंड उपस्थिती लाभली. बलिप्रतिपदा दिवशी, शेतकरी कष्टकरी समाजाचा राजा सम्राट बळीराजा यांचा सत्य इतिहास समजून घ्यायला पहाटे ठीक 6 वाजता मुंबईतील विलेपार्ले येथील दिनानाथ नाट्यगृह येथे मोठ्या संख्येने बंधू भगिनी उपस्थित होते. कुणबी युवा मंडळाचे अध्यक्ष माधव कांबळे आणि त्यांच्या सहकारी पदाधिकारी यांनी गेले दोन महिने यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. उपाध्यक्ष: डॉ. मंगेश सानप, विनोद भोईर, शैलेश कावणकर, अमेय खापरे. सरचिटणीस: युवराज संतोष. सहसचिव: वैभव वालम, मिलिंद चिबडे, अविनाश मालप, रमेश करंजे. खजिनदार: विजय भोस्तेकर सोबत कुणबी युवा कार्यकारणी, विविध विभागांचे प्रतिनिधी, कुणबी कलामंच, कुणबी युवा आय टी प्रचारक टीम, कुणबी युवा ब्रिगेड, तालुका युवा पदाधिकारी, सक्रीय शिलेदार यांनी प्रचंड मेहनतीने हा कार्यक्रम यशस्वी केला.
प्रस्त्वाविक सहसचिव मिलिंद चिबडे, वैभव वालम यांनी तर सूत्रसंचालन सचिव युवराज संतोष यांनी केले. विचारमंच व्यवस्था गिरीश बारस्कर, समीर रेवाळे, योगेश मालप, दाता आग्रे, संजय काजारे, सुनिल कुळ्ये, एकनाथ डिंगणकर, अनिल अवेरे, विवेक कातकर आणि सहकारी यांनी केले. प्रमुख ओबीसी जनमोर्चा अध्यक्ष, माजी आमदार श्री. अण्णाभाऊ शेंडगे, कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर, उपाध्यक्ष जे.डी.तांडेल, कुणबी समाजोन्नती संघाचे सेक्रेटरी अरविद डाफळे, उपाध्यक्ष बबनराव उंडरे, सहसचिव गणेश मौले, भास्कर चव्हाण, हरिश्चंद्र पाटील, गुहागर शाख्याध्यक्ष कृष्णा वणे, कार्यकारणी सदस्य संभाजी काजरेकर, रुचिता बोलाडेताई, महिला मंडळाच्या सेक्रेटरी दिपिका आग्रे, प्रबोधनकार मारुतीकाका जोशी, राजकीय संघटन समितीचे नंदकुमार मोहिते, संघ कार्यकारणी सदस्य, तालुका, विभागीय शाखांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कुणबी युवा प्रतिनिधी, प्रचारक, विद्यार्थी, युवती, कुणबी महिला मंडळ, कुणबी कला मंच तसेच ग्रामीण भागातील मान्यवर उपस्थित होते.

बळी पहाट निमित्ताने कुणबी कला मंचाच्या ७० कलाकारांनी ‘रावण-एक न उलगडलेलं कोड .. हे महानाट्याचे सादरीकरण केले. खरा रावण आणि त्याची जीवन कहाणी यावेळी उपस्थितांच्या मनाला विचार करायला भाग पडून गेली. निवेदक युवराज संतोष आणि रमेश कांबळे यांच्या लेखणीतून व दिग्दर्शक सुभाष गोताड यांच्या कल्पक दिग्दर्शनाने हि कलाकृती निर्माण झाली आहे. यावेळी ४१ सक्रिय शिलेदार व मान्यवर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विविध माध्यमातून जमा करण्यात आलेलली देणगी रुपये अडीच लाखाचा धनादेश संघ पदाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी युवाच्या वतीने वरिष्ठांच्या सन्मान करण्यात आला. आण्णा भाऊ शेंडगे (अध्यक्ष: ओबीसी जनमोर्चा, मा. आमदार), चंद्रकांत बावकर, (संघाध्यक्ष आणि विद्यमान ओबीसी जनमोर्चा कार्याधाय्क्ष), जे. डी. तांडेल (जेष्ठ अर्थतज्ञ, अखिल आगरी समाज परिषद कार्याध्यक्ष, आणि ओबीसी जनमोर्चा उपाध्यक्ष), अरविंद डाफळे : ओबीसी जनमोर्चा – सेक्रेटरी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई – सेक्रेटरी कृष्णा वणे साहेब कुणबी समा. संघ मुंबई शाखा ता. गुहागर (अध्यक्ष), ओबीसी जनमोर्चा सचिव,कोकण विभाग, संभाजी काजरेकर (कोकण विभाग समन्वयक, ओबीसी जनमोर्चा).
यावेळी विशेष सत्कारमूर्ती म्हणून मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला.अनंत पाष्टे वैभववाडी, सिंधुदुर्ग – कुणबी विवाह सल्लागार मंडळ, प्रशांत डिंगणकर मूळ गाव, पालशेत, तालुका गुहागर युवा साहित्यिक, लेख कवी, गाजलेली कथा-कुणब्याचा गावगाडा, काव्य संग्रह – काय समजलिव ? (ठाणे शहर शाखेचे माझी युवा सेक्रेटरी), रामचंद्र देसले(ठाणे शहापूर दानशूर व्यक्तिमत्व), ज्ञानेश्वर जनार्दन नास्कर(तळा वरिष्ठ समाजिक कार्यकर्ते), जगन्नाथ कांदळेकर(महाड पोलादपूर, वरिष्ठ समाजिक कार्यकर्ते), डॉ. शामकांत गजमल(चिपळूण ग्रामीण शाखा अध्यक्ष, होस्टेलचे माजी विद्यार्थी), कृष्णाजी बेटकर सर.(चिपळूण ग्रामीण शाखा वरिष्ठ सामाजिक नेतृत्व). याचवेळी क्रियशील शाखा / युवा शाखा म्हणून कुणबी समाजोन्नती संघ मुंबई व कुणबी युवा मुरुड जंजिरा शाखेचा सन्मान करण्यात आला. अनंत फिलसे साहेब-दापोली (वसई शाखा प्रमुख संघटक, नेहमीच समाजात सक्रीय). किशोरे भेरे-विरार (कुणबी समाजोन्नती संघ मुंबई विभागीय शाखा विरार – अध्यक्ष), प्रभाकर मांडवकर-राजापूर (सक्रीय कुणबी युवा शिलेदार), अनन्या भूपेंद्र गोणबरे (सायन हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवा), अनिल अवेरे-रत्नागिरी (वैद्यकीय सेवा… खरे देवदूत), महेश गोंडाळ-राजापूर (कोरोना काळात मोठे योगदान, वैद्यकीय सेवा खरे देवदूत), एड. विशाल गोलांबडे-महाड(कायदेविषयक सल्लागार, युवा कार्यकर्ते), सचिन देवळे (कुणबी युवा सह प्रचार प्रमुख तालुका महाड पोलादपूर), करुणा अनंता पाटील ताई, ठाणे जिल्हा, तालुका शहापूर शाखा, कुणबी महिला मंडळ सदस्या), केशव करण, शहापूर (कुणबी, ओबीसी कार्यकर्ते आणि शिक्षक), विघ्नेश दैत- लांजा (युवा प्रचारक), दिलीप कातकर-विक्रोळी शाखा (समाजिक आंदोलनात सक्रीय सहभाग), निलेश कोकमकर (चिपळूण)–युवा प्रचारक , संदीप गीते- संगमेश्वर (संगमेश्वर तालुका शाखा युवा उपाध्यक्ष), शैलेश दळवी-संगमेश्वर (एक मेहनती, कर्तव्यतत्पर युवा प्रचारक), प्रवीण ढवळ-संगमेश्वर (एक मेहनती, कर्तव्यतत्पर युवा प्रचारक), महेश सानप. जीव रक्षक, रोहा, अनेक नैसर्गिक आपत्तीमध्ये यांची मोलाची कामगिरी, शाहीर वसंत भोईर-रोहा जिल्हा रायगड, एकाला क्षेत्रात नावाजलेले व्यक्तिमत्व , राजेश गोपाल मेटकर-खेड शाखा युवा पदाधिकारी आणि सक्रीय शिलेदार, हिरु लक्ष्मण चाळके-तळा(जिल्हा रायगड, युवा प्रचारक, शिलेदार), हरेश पवार-तालुका रोहा, (कुणबी युवा प्रचारक), प्रभाकर धनावडे-संगमेश्वर (समाजसेवक), संदीप राडये-राजापूर (माजी युवाध्यक्ष आणि सक्रीय कार्यकर्त) , हरेश पवार-रोहा (रायगड युवा प्रचारक)

युवा मंडळसाठी विशेष योगदान , युवा प्रेरणा पुरस्कार सौ. दिपिका संदीप आग्रे (लांजा) कुणबी समाजोन्नती संघ मुंबई सल्गन कुणबी महिला मंडळ (सेक्रेटरी) यांना प्रधान करण्यात आला. कुणबी युवला नेहमीच सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सन्मान श्री. रुपेश राम उभारे सर… सामाजिक कार्यकर्ते, दानशूर नेतृत्व, जिल्हा रायगड (मुरुड जंजिरा आश्रय दाते), श्री. वासुदेव साळवी, देवगड, सिंधुदुर्ग (समन्वयक ओबीसी जनमोर्चा, सिंधुदुर्ग जिल्हा, आणि दानशूर व्यक्तिमत्व) यांचा सन्मान करण्यात आला. कुणबी युवा तालुका अध्यक्ष यांनी विशेष योगदान दिले.

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई यांच्यावतीने कुणबी तसेच बहुजन समाजाला संघटीत व जागृत करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. कोकणातील आणि राज्यातील ओबीसी कुणबी समाजाला संविधानाने दिलेल्या हक्क अधिकारासाठी जागृत करण्याचे कार्य गेली १०२ वर्ष हि मातृसंस्था करीत आली आहे. सर्व समाजाला पूरक असे काम या समाजिक संस्थेचे नेहमीच राहिले आहे. १०२ वर्षाची गौरवास्पद वाटचाल असलेल्या संघटनेची युवा विंग “मुंबई युवा मंडळ, हे प्रचंड ताकदीने प्रबोधनाची वाट धरून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करीत आणूस समाजात पसरलेली अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, जमीन कुळकायदा, शिक्षण, रोजगार, आरोग्य बाबत सांस्कृतिक कार्यक्रमातून समाज प्रबोधन करण्याचे काम कुणबी युवा मुंबई करीत असून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर समाजात जनजागृती, आंदोलन करण्याचे कार्य युवकांच्या माध्यमातून सातत्याने होते. कुणबी बहुजन समाजातील युवाशक्ती जागृत झाली असून आपल्या हक्क अधिकार आणि रणनीतीवर आधारित संघटन बांधणीचे व पुढील दिशा कोणत्या प्रकारे असेल याचे विचार मंथन करण्यासाठी प्रत्येक वर्षी “बळी पहाट” साजरी करण्यात येते. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील सामाजिक विचारवंत, तसेच ओबीसी वर्गातील अभ्यासक, कुणबी समाजातील युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. समाजातील ही वैचारिक जागृती म्हणावी लागेल. उपस्थित राहिलेल्या सर्व बंधू भगिनी व युवा वर्गाचे, मान्यवरांचे आभार..!
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई
कुणबी युवा मुंबई
