मुंबई, दि.4 नोव्हेंबर भाग्यश्री रासने (प्रतिनिधी) : मुंबईची लाईफ लाईन मानल्या जाणाऱ्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ केली होती. अनेक ठिकाणी ही दरवाढ करण्यात आली होती. हे दर दहा रुपयांवरुन 30 ते 50 रुपये करण्यात आले होते.
या निर्णयला प्रवाशांनी विरोध केला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने हा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वी फलाट तिकीटांचा दर वाढवला होता, असे दर वाढवण्याचा विभागीय रेल्वे मॅनेजराचा अधिकार रेल्वे बोर्डाने काढला होता.
