मुंबई, दि. 9 नोव्हेंबर(प्रतिनिधी) : गेल्या शंभर दिवसां पासून अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत अखेर तुरुंगाबाहेर आले आहेत. राऊत तुरुंगाबाहेर आल्यानंतर शिवसैनिकांकडून मुंबईत ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येत आहेत.
फटाके फोडून, मिठाई वाटून न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे. यावेळी शिवसैनिकांमध्ये एक नवी उमेद आणि नवचैतन्याचं वातावरण, उत्साह दिसून येत आहे.
मुंबईत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संजय राऊत यांचं स्वागत करण्यात आलंय. संजय राऊत तुरुंगाबाहेर निघताच त्यांच्यासमवेत शिवसैनिकांनी दुचाकीवरुन रॅली काढली आहे. यावेळी ऑर्थर रोडबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. याप्रसंगी ‘कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला’ अशा घोषणा शिवसैनिकांकडून देण्यात आल्या.
तर दुसरीकडे पुण्यात देखील राऊत यांच्या जामीनावर जल्लोष साजरा करण्यात आला आहे. ऑर्थर रोडवरून संजय राऊत आता बाळासाहेबांना वंदन करुन घरी जाणार आहेत, आणि उद्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Artificial intelligence creates content for the site, no worse than a copywriter, you can also use it to write articles. 100% uniqueness :). Click Here:👉 https://stanford.io/3FXszd0