मुंबई, दि.9 नोव्हेंबर(प्रतिनिधी) : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आजपासून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यभरात 18 हजार 331 जागांसाठी पोलीस भरती होणार आहे. राज्याच्या गृहविभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वी पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती. तशी जाहिरात राज्यातील अनेक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, काही कारणास्तव पोलीस भरतीला स्थगिती देण्यात आली.
मात्र आता पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आजपासून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. 18 हजार 331 जागांसाठी पोलीस भरती होणार असून यासाठी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेतले जाणार आहेत.
यानंतर आधी शारीरीक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. कोरोना काळात ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीचा अर्ज भरला, अशा उमेदवारांना या भरतीत जागा मिळेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण त्यानंतर गृहविभागाने या उमेदवारांकरिता निर्णय घेत पोलीस भरतीची संधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Artificial intelligence creates content for the site, no worse than a copywriter, you can also use it to write articles. 100% uniqueness :). Click Here:👉 https://stanford.io/3FXszd0