नांदेड, दि. 9 नोव्हेंबर(प्रतिनिधी) : राज्यात भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येतोय. ही यात्रा कृष्नूर ते नांदेड पदयात्रेदरम्यान बुधवारी राहुल गांधी यांनी शेतकरी, शेतमजूर, बचत गटांच्या महिला, विद्यार्थी यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या सर्व यात्रेत कुटुंबासह सहभागी कोळी बांधवांचं कुटूंब सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं. मुंबईहून भारत जोडो यात्रेत दाखल झालेल्या कोळी बांधवांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन आपल्या समस्या सांगतल्या. आज या यात्रेचा चौथा दिवस आहे. राज्यातील भारत जोडो यात्रेच्या चौथ्या दिवशी राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार सहभागी होऊ शकतात. अशातच चौथ्या दिवशी कसा असेल या यात्रेचा संपूर्ण कार्यक्रम हे जाणून घेऊ.
राहुल गांधींनी सुरू केलेल्या भारत जोडो पदयात्रेचा आज 64 वा आणि महाराष्ट्रातला आज चौथा दिवस आहे. सकाळी 6 वाजल्यापासून राहुल गांधी पदयात्रेला नांदेडच्या लोहा येथून सुरूवात करतील. तर सायंकाळी 4 वाजता देगलुर नाका येथून पुन्हा पदयात्रेला सुरूवात होईल.

Artificial intelligence creates content for the site, no worse than a copywriter, you can also use it to write articles. 100% uniqueness :). Click Here:👉 https://stanford.io/3FXszd0