कल्याण, दि. 15 नोव्हेंबर (प्रतिनिधी) : यंदाच्या वर्षी 2022.रोजी दिवाळी किल्ले बनविणे स्पर्धा “माझा प्रभाग माझा परिवार ” रांगोळी स्पर्धा 2022.प्रभाग क्र.11. मनसे शाखा अध्यक्ष. गणेश लांडगे. व मयुरी लांडगे यांच्या तर्फे आयोजित करण्यात आली होती.
किल्ले बनविणे व रांगोळी स्पर्धा मध्ये कल्याण पश्चिम येथील भोईर कॉलनी, मनीषा नगर, अंबिका निवास व ठाणकर पाडा अशा अनेक प्रभागातील मुलां- मुलींनी मोठया उत्साने भाग घेतला. लहान मुलांच्या पाठीवर मायेची थाप देत त्याच्या अंगी -कला, गुणांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम “गणेश लांडगे ” व मयुरी लांडगे कित्येक वर्ष करत आहेत. समाजाबद्दल ची आपुलकी व बांधूलकी जपत असल्यामुळे त्याच्या कामाबद्दल सर्वांकडून मनमुराद प्रतिसाद मिळत आहे…गणेश लांडगे व वरिष्ठ परीक्षकांनी कार्यकर्त्यांनी, विभागातील अनेक ठिकाणच्या बनवलेल्या दिवाळी किल्ल्याच्या प्रतिकृती ना भेट दिली. या वेळी अनिल शेजवळ , प्रकाश चावरे, सुरेश कदम, सागर उमवणे, विनायक भालेराव, तेजराज शेलार, बाळु भोर, मयुरेश गांलिदे, प्रसाद साबळे, प्रमोद कदम,गौरव भोईर, प्रथम भोईर वरूण भोईर निरज भोईर, अलका शेजवळ, दिपाली साबळे, सविता वाघ यां कार्यकर्त्याचा सहभाग होता. दिवाळी किल्ला प्रतिकृती स्पर्धेचा पारितोषिक निकाल दिनांक 13 नोव्हेंबर 2022 रोजी जाहीर झाला. ह्या स्पर्धेमध्ये
1)सिद्धिविनायक कॉलनी येथील सिद्धी विनायक मित्र मंडळ ” किल्ला पदमदुर्ग यास प्रथम पारितोषिक.
2) दुसरे पारितोषिक विजेते “अंबिका निवास “शिवस्व “ग्रुप व मार्गदर्शक ओंकार चव्हाण ” पुणे “चाकण ” किल्ला संग्राम दुर्ग .3)तृतीय क्रमांकाचे पारितोषिक “साई मित्र मंडळ ” किल्ला राजगड “
तसेच उत्तेजनार्थ पारितोषिकाचे मानकरी *ओमकार बेळगावकर. ” किल्ला लोहगड” एकविरा आई दुर्गा नगर किल्ला “लोहगड.
*शिवप्रतिष्ठान मंडळ. किल्ला” प्रतापगड”
या सर्व विजेत्यांचे व सर्व सहभाग घेतलेल्या स्पर्धकांना
बक्षीस वाटप व प्रशस्तीपत्रक ” देऊन सर्वाना शुभेच्छा देत गणेश लांडगे व मयुरी लांडगे यांनी आभार व्यक्त केले.तसेच “माझा प्रभाग माझा परिवार” रांगोळी स्पर्धा 2022. हा कार्यक्रम अतिशय दिमाखात पार पडला. या स्पर्धेत मुली व -महिला तसेच पुरुष वर्गाने मोठया संख्येने भाग घेतला. स्पर्धकांनी आपल्या दैनंदिन जीवनात येणारे प्रश्न आपल्या रांगोळीतून दर्शविली होती. वाढती महागाई,स्त्रियांवर होणारे अत्याचार त्यांचे हक्क, सामाजिक, संगीताचे फायदे अश्या अनेक विषयावर सुंदर “रोंगोळी “काढण्यात आली. दिनांक 13 नोव्हेंबर 2022 रोजी बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यात प्रमुख पाहुणे माजी आमदार प्रकाश भोईर,उप शहर अध्यक्ष गणेश चौधरी, जिल्हा सचिव शारीरिक सेना अनिल शेजवळ. विभाग अध्यक्ष संतोष अमृते महाराष्ट्र महिला सेना सरचिटणीस उर्मिला तांबे, महिला सेना जिल्हा अध्यशा नयना भोईर..महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा चेतना रामचंद्रन शहर संघटक स्मिता खरे, विभाग
अध्यक्षा अनिता प्रसाद, उपविभाग अध्यक्षा अलका शेजवळ.,मनसे सैनिक मयुरी लांडगे, उप विभाग उपाध्यक्षा अनिता महापराळकर, शाखा अध्यक्षा दीपाली साबळे..अश्या अनेक पदाधिकारी वर्गाचा सहभाग होता..स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धाकांना प्रशस्ति पत्रक देऊन बक्षीसे वाटप केले..व सर्व स्पर्धाकांचे अभिनंदन ही केले..मनोज मेस्त्री सर(जनमत) यांनी देखील रांगोळीचे छायाचित्रण अतिशय सुरेख पद्धतीने केले होते.
Related Stories
March 20, 2023
December 16, 2022
