कल्याण, दि. 20 मार्च 2023 (चित्रलेखा) : प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या मागे एक स्त्री असते.कधी ती आई,पत्नी, बहिण, प्रेयसी, मैत्रीण ,मुलगी असते.अनेकदा ती गुरूच्या भूमिकेत पुरुषाला घडवत असते.इतिहासात ‘स्त्री ‘चे महात्म्य सर्वश्रुत आहे. स्त्री चे शौर्य कदापी नाकारू शकत नाही.आजची स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्राला कर्तव्य आणि कर्तृत्व रूपाने फार मोठे योगदान देतच आहे.रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंड मागील अनेक वर्षांपासून स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवत आहे.कल्याण शहरातील 75 व्या वर्षांकडे वाटचाल करीत आहे, या निमित्ताने समाजात विविध क्षेत्रात उत्तमोत्तम कामगिरी व कतृत्व सिद्ध करणाऱ्या महिलांचा रोटरी क्लब च्या व्यसपीठावर सन्मान होऊन समाजाला देखील अशा कर्तृत्ववान स्त्रियांची ओळख व्हावी हा शुद्ध हेतू डोळ्यासमोर ठेवला. यांमध्ये कला,क्रिडा, संशोधन, सरंक्षण, पर्यावरण, समाजसेवक, प्रशासन, साहित्य व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या रागिनींचा सन्मान सोहळा पार पाडण्यात ,तसेच व्यवस्थित परीक्षण करण्यात संपूर्ण रोटरी क्लब च्या टीमने परिश्रम घेतले.रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंडस् आणि साप्ताहिक कल्याण नागरिक चे वतीने जागतिक महिला दिनाचे निमित्ताने उत्तमोत्तम कामगिरी करणाऱ्या महिलांना “जीवन गौरव पुरस्कार” व “जीवन प्रेरणा पुरस्कार “देतांनाच प्रत्येकीच्या आयुष्यातील कार्याचा आढावा लेखन स्वरूपात समाजा समोर यावा म्हणून कल्याणी महिला रोटरी विषेश अंक प्रकाशित करण्यात आला. (समाजशील व्यक्तिमत्त्व .डॉ. भावना घोलप, समाजासाठी तत्पर-विभा जैन, ऍड. विद्या मोहिते, धनश्री बागुल, स्नेहा जगताप,अष्टपैलू व्यक्तिमत्त्व-उमा सिंह,कथक, नाट्य,गायन व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी भाग्यश्री मधुकर रासने, सुवर्ण पदक विजयी-नीता बोरसे, टेबल टेनिस पटू-श्रुती कानडे-जोशी, सुवर्ण स्पेशालिस्ट हेल्थ -डॉ. तेजल खडकबाण, अनाथांची आई-डॉ. सुरेखा जाधव, वैद्यकीय सेवा-डॉ. सुवर्णा घोणे, आयुर्वेद-डॉ. सोनो मोरे,विदेशात भारताचे प्रतिनिधित्व -डॉ. क्षमा आगरकर, समालोचन-सुकन्या जोशी,स्वरानंदाचा अनुपमेय अविष्कार-अबोली ठोसर, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व-श्रध्दा वझे, पत्रकार-सायली शेजवळ, छपाईच्या माध्यमातून जनसेवा-स्मिता नेवे,यशस्वी उद्योजक-मंजुषा पैठणकर, नॅप कींन बुके प्रचारक-सविता पोळ,भारतीय संस्कृती प्रचारक-रेखा मालपुरे,भारत भ्रमण कर्त्या-शिल्पा नातू,साहित्यिक ते निवेदक-संगीता कुलकर्णी, स्व-रक्षण-शोनल मेहरोळ, अग्निशमन दल-प्रियंका धरम,मनोविकार संजीवनी-डॉ. संध्या रायकर,बालसंस्कार केंद्राची स्थापना-सुषमा सहस्त्रबुद्धे, गरजूंसाठी foudetion-फेलसी फर्नांडिस, शिक्षक क्षेत्र-नेहा नेर,समाजसेवा-डिंपल धाइफुलें, समाजभूषण-अनिता कळसकर, अंधांच्या स्वावलंबनासाठी झटणाऱ्या संपदा पळणीटकर,लता पालवे योजना घरत,महिला उद्घारक-सुलेखा गटकळ, आदिवासींचा सर्वांगीण विकास-स्मिता खंगटे, आबालवृद्ध च्या तारका -ज्योती अघाणे,पॉवर लिफटींगच्या सुवर्ण मानकरी-पल्लवी घुडे,काजल भाकरे,बाल्यावस्थेतील यशस्वी अभिनेत्री-गायत्री जोशी,यांसारख्या विविध क्षेत्रात मानाचे स्थान पटकवणार्या महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख अतिथी रो. कैलास जेठाणी-डिस्ट्रिक्ट गव्हर्नर उपस्थित असून पद्ममश्री गजानन माने यांचा सत्कार विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता आणि समाधान,प्रेम मनापासून भेटत होते. सांगता समारोप सोहळा सुंदर अशा अल्पपहाराने पार पडला.
तुझ्या प्रयत्नांना मिळू दे,
यशाची सोनेरी किनार,
लक्ष दिव्यांनी उजळू दे,
तुझा संसार :कर्तृत्व आणि
सामर्थ्यची ओढून ये नवी झालर,
स्त्री शक्तीचा होऊ दे
पुन्हा एकदा जागर!!!
