मुंबई, दि. 18 नोव्हेंबर (प्रतिनिधी) : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर दोन जण जखमी झाले आहेत.मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील बोरघाटात झालेला अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. दरम्यान, हा अपघात मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर झाला आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील बोरघाटात भरधाव येणाऱ्या आर्टीगा कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तात्काळ नवी मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण होता की, या अपघातात आर्टीगा कारचा चक्काचूर झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरच कारचा भीषण अपघात झाल्यामुळे काही काळासाठी मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, अपघातानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं. अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
