अहमदनगर, दि. 24 नोव्हेंबर(प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक आज शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी जत तालुक्यातील गावांवर कर्नाटक सरकारने केलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली. पूर्वी गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती होती. त्यावेळी काही ठराव झाले होते. पण आता सुविधा निर्माण केल्या जात आहे. त्यामुळे एकही गाव बाहेर जाणार नाही, याची जबाबदारी आमच्यावर आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री शिंदे हे आज सपत्निक साईबाबा चरणी नतमस्तक झाले. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील उपस्थित होते. त्यानंतर ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, जत तालुक्यातील काही गावांना २०१२ मध्ये कर्नाटकमध्ये जाण्याचा ठराव केला होता. त्या काळी गावांमध्ये पाण्याची टंचाई होती. त्या ठिकाणी जल उपसासिंचन प्रकल्प सुरू करण्यात आले आहे. काही प्रकल्पांचे काम सुरू आहे. नवीन प्रकल्प केले जातील. जतमधील एकही गाव बाहेर जाणार नाही, याचा जबाबदारी
