मुंबई, दि. 25 नोव्हेंबर(प्रतिनिधी) :आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने मुंबई : 25 नोव्हेंबर(प्रतिनिधी)आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने कोकणावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. 25 नोव्हेंबरला रत्नागिरी व 26 नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा बावनकुळे करणार आहेत.पक्षाच्या बळकटीसाठी भाजपने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. कणकवली इथे नितेश राणे यांच्या रुपाने भाजपचा एकमेव आमदार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये कोकणात आपली राजकीय ताकद दाखवण्याच्या दृष्टीने चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा महत्त्वाचा असेल.राज्यातल्या विशेष अशा 16 लोकसभा मतदारसंघांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. त्यामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. सध्या ठिकाणी विनायक राऊत यांच्या रुपाने शिवसेनेचा खासदार आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भाजप जोरदार तयारी करत आहे. दरम्यान बावनकुळे यांच्या दौऱ्या दरम्यान बाईक रॅली, जिल्हा संघटनात्मक मेळावा, सोशल मीडिया बैठक, बूथ समिती बैठक, युवा वॉरिअर शाखांचे उद्घाटन अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. भाजप रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघावर दावा करत आहे. त्याचवेळी शिंदे गट देखील हा लोकसभा मतदारसंघ आमचा असल्याचं म्हणत आहे. अशा राजकीय परिस्थितीमध्ये बावनकुळे यांचा दौरा निश्चितच महत्त्वाचा आहे.
पक्षाच्या बळकटीसाठी भाजपने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. कणकवली इथे नितेश राणे यांच्या रुपाने भाजपचा एकमेव आमदार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये कोकणात आपली राजकीय ताकद दाखवण्याच्या दृष्टीने चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा महत्त्वाचा असेल.
राज्यातल्या विशेष अशा 16 लोकसभा मतदारसंघांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. त्यामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. सध्या ठिकाणी विनायक राऊत यांच्या रुपाने शिवसेनेचा खासदार आहे.
आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भाजप जोरदार तयारी करत आहे. दरम्यान बावनकुळे यांच्या दौऱ्या दरम्यान बाईक रॅली, जिल्हा संघटनात्मक मेळावा, सोशल मीडिया बैठक, बूथ समिती बैठक, युवा वॉरिअर शाखांचे उद्घाटन अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
भाजप रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघावर दावा करत आहे. त्याचवेळी शिंदे गट देखील हा लोकसभा मतदारसंघ आमचा असल्याचं म्हणत आहे. अशा राजकीय परिस्थितीमध्ये बावनकुळे यांचा दौरा निश्चितच महत्त्वाचा आहे.
