मुंबई, दि. 25 नोव्हेंबर (प्रतिनिधी) : काय झाडी, काय डोंगर फेम आमदार शहाजी बापू पाटील हे गुवाहाटी दोऱ्यादरम्यान चांगलेच गाजले होते. या दौऱ्यामुळे ते भावूक झाले आहेत. उद्या म्हणजेच 26 नोव्हेंबर रोजी शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीला जाणार आहे. यावेळी शहाजी बापू म्हणाले यापुढे मी दरवर्षी कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला जाणार आहे. गुवाहाटीमुळे मी सेलिब्रिटी झालो हे वास्तव आहे. मी आता पत्नीसह दरवर्षी कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणार आहे. असं शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं.
उद्या म्हणजेच 26 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वच्या सर्व 50 आमदारांना घेऊन गुवाहाटीला जाणार आहेत. गुवाहाटीत कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी हे सर्व आमदार जाणार आहेत. निश्चितपणाने पुन्हा गुवाहाटीच्या आठवणी ताज्या होणार आहेत. खास करून माझ्या संवादाने मला प्रसिद्धी मिळाली आणि जनतेने केलेले माझ्या माणदेशी भाषेचे कौतुक यामुळे कामाख्या देवीच्या दर्शनाला गेल्यावर माझ्या डोळ्यातून अश्रू येणार आहेत, असं शहाजीबापू पाटील म्हणाले.
सीमावादावर शहाजी बापू म्हणाले
आजवर कर्नाटकच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या जनतेला खुश करण्यासाठी अशी विधाने केली आहेत. हे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रातील 40 गावं तर काय, एक एकर जमीनही देणार नाही. कर्नाटकच्या जनतेने एवढे लक्षात ठेवावं, छत्रपतींनी निर्मित केलेल्या महाराष्ट्रातील मावळे अजूनही जिवंत आहेत, असा इशाराच त्यांनी दिला.
