नवी दिल्ली, दि. 2 डिसेंबर (प्रतिनिधी) : बॉलिवूड स्टार आयुष्मान खुरानाने दिल्लीतील एक स्ट्रीट सिंगर शिवमचे स्वप्न पूर्ण केले आहे. आपल्या मधुर आवाजाने आणि चमकदार गिटारने राजधानीतील लोकांचे मनोरंजन करणाऱ्या शिवमला नेहमी आयुष्मानला भेटण्याची आणि त्याच्यासोबत गाण्याची इच्छा होती. विकी डोनरमधील आयुष्मानचे पाणी दा रंग हे त्याचे आवडते गाणे आहे.
शिवमने ब्लॉकबस्टर गाण्याचा व्हिडीओ आयुष्मानला टॅग केले होते. शिवमची पोस्ट पाहून, आयुष्मानने त्याला वचन दिले होते की, त्याच्या आगामी अॅक्शन हिरोच्या प्रमोशनसाठी दिल्लीत तो त्याला भेटेल. त्यानंत आता आयुष्मानने शिवमला आश्चर्यचकित केले.
त्याने केवळ शिवमशी भेट घेतली आणि गप्पा मारल्या नाहीत, तर आयुष्मानने त्याच्या आगामी ‘अॅक्शन हिरो’ या चित्रपटातील ‘पानी दा रंग’ आणि ‘जेहदा नशा’ या गाण्यांवर धमाल केली आणि रस्त्यावर आयुष्मानला पाहून आश्चर्यचकित झालेल्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. आयुष्मानने शिवमच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत म्हटले, “शिवम मेरा गाना गाने के लिए शुक्रिया! भरपूर प्रेम.
भारतातील नवोदित कलाकारांवर आयुष्मानची नेहमीच नजर असते. प्रतिभावान अभिनेता नेहमीच अशा निर्मात्यांची कामे शेअर करतो मग ते कवी, चित्रकार, संगीतकार, गायक, नर्तक इत्यादी असोत! त्याचा अॅक्शन हिरो हा चित्रपट उद्या रिलीज होतोय.
