ठाणे, दि.02 (जिमाका) :- भारतीय संविधानाच्या समता पर्वानिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या वतीने अनुसूचित जाती घटकातील समाजसेवी कार्यकर्ते, कर्मचारी यांची कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन वाचन करून तज्ज्ञ व्यक्तिंनी संविधानासंदर्भात मार्गदर्शन केले.
भारतीय संविधानाबाबत राज्यामध्ये जनजागृती व्हावी, यादृष्टीने दि.26 नोव्हेंबर संविधान दिवस ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबरपर्यंत समता पर्व साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत अनुसूचित जाती उत्थान: दशा आणि दिशा या विषयावर अनुसूचित जाती घटकासाठी कार्य करणारे समाजसेवी कार्यकर्ते, कर्मचारी वर्ग यांची कार्यशाळा तसेच तज्ञ व्यक्तींकडून संविधानाबाबत जनजागृती करण्यासंदर्भात व्याख्यान नुकतेच झाले.
महाविद्यालयस्तरावर संविधानबाबत जनजागृती व्हावी. तसेच अनुसूचित जाती घटकासाठी कार्य करणारे समाजसेवी कार्यकर्ते याना रघुनाथ देशमुख, अध्यक्ष, मोहासुर सामाजिक संस्था यांनी उपस्थिताना संबोधन केले.
