ठाणे, दि.8 : संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार (सर्व साधारण) राजाराम तवटे यांनी श्री. जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी नायब तहसीलदार संतोष भोईर, अव्वल कारकून सुमेध राऊत आदि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.