तवांग : 13डिसेंबर (प्रतिनिधी)
अरुणाचल प्रदेशमधील तवांगमध्ये वास्तविक नियंत्रण रेषा (एलएसी) वर भारतीय सैनिकांनी चीनी सैनिकांना प्रतिउत्तर दिले आहे. जखमी चीनी सैनिकांची संख्या भारतीय सैनिकांच्या तुलनेत खुप जास्त आहे. भारत आणि चीनी सैनिकांमध्ये झालेल्या या चकमकीच्या मुद्द्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उच्च स्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत चीफ ऑफ डिफेंस स्टाफ(CDS) जनरल अनिल चौहान आणि तिन्ही सैन्याचे प्रमुख संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना या घटनेबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
दुसरीकडे आज या मुद्द्यावरून संसदेत गदारोळाची शक्यता आहे. कॉंग्रेस पंतप्रधान मोदींना उत्तर मागत आहे. तर विरोधी पक्षातील अनेक खासदारांनी सस्पेंशन ऑफ बिजनेस नोटिस दिली आहे. भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीच्या मुद्द्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लोकसभेत आणि राज्यसभेत उत्तर देणार आहेत.
एलएसीवर चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) च्या सैनिकांचा जमाव 9 डिसेंबरला दिसून आले होते. भारतीय सैन्याच्या जवानांनी चीनी सैन्याला तेथुन हटवण्यासाठी म्हटले की त्यांना पुढे जाण्यापासून रोखले. त्यानंतर झालेल्या चकमकीत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले. चकमक झाल्यानंतर लगेचच दोन्ही बाजूचे सैन्य आपापल्या भागात परतले. चिनी सैनिकांनी अचानक केलेल्या या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिल्याचे सांगण्यात येत आहे. भारताकडून 20 सैनिक जखमी झाले, तर जखमी चिनी सैनिकांची संख्या दुपटीने अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतर, भारतीय स्थानिक कमांडरने चिनी बाजूच्या कमांडरसोबत ध्वज बैठक घेतली आणि पूर्वनियोजित व्यवस्थेअंतर्गत शांतता आणि स्थिरता पुन्हा सुरळीत करण्यासाठीर चर्चा केली. तवांगमध्ये LAC चे काही भाग आहेत जिथे दोन्ही बाजू आपला दावा करतात आणि दोन्ही देशांचे सैनिक येथे गस्त घालतात. हो 2006 पासून सुरू आहे.
