पुणे :15 डिसेंबर(प्रतिनिधी
फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाच्या मराठी अनुवादाला जाहीर झालेला पुरस्कार राज्य सरकारनं मागे घेतला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणखी दोन लेखकांनी राजीनामे दिले आहेत.
त्यावरून राज्यात राजकीय वातावरण पेटलेलं असतानाच आता दोन लेखकांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी राजीनामे दिले आहेत. लेखक आणि साहित्यिक विनोद शिरसाट आणि लक्ष्मीकांत देशमुख यांनी राजीनामा देत लेखिका अनघा लेले यांना जाहीर झालेला पुरस्कार रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे.
तर दुसरीकडे फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाच्या मराठी अनुवादाला मिळालेला पुरस्कार शिंदे-फडणवीस सरकारनं रद्द केल्याच्या निषेधार्थ लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांनी भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी लेखिका प्रज्ञा दया पवार आणि कवयित्री नीरजा यांनीही शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाचा निषेध करत मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
