मुंबई, दि. 17 डिसेंबर (प्रतिनिधी) : मुंबई पोलीस आयुक्त
विवेक फणसाळकर यांची मुलगी मैत्री हीच लग्न आहे. अशा धावपळीत लग्नाच्या सर्व विधी सोडून फणसाळकर हे आज असलेल्या महामोर्चाच्या बंदोबस्तात सेवा देत होते. मुलीच्या बापासाठी आयुष्यभराचा एक हृदयस्पर्शी क्षण म्हणजे तिचे लग्न….मात्र अशा क्षणाला देखील आपले कर्तव्य न विसरता एका बापाने एका आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.
मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या मुलीचा विवाह होता. त्यांनी सकाळी धार्मिक पद्धतीने विधी झाल्यावर फणसाळकर घरातून बाहेर पडले. घरात पाहुण्यांची गर्दी, थाट माट सुरू होता. आज संध्याकाळी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे रिसेप्शन ठेवण्यात आले. मात्र आजच्या मोर्च्यामुळे लग्नासाठी आवश्यक सर्व तयारी वर देखरेख सोडून, फणसाळकर मोर्चा मध्ये बंदोबस्तावर बारीक नजर ठेऊन होते.
महाआघाडीचा मोर्चा स्वरूप विशाल होत. त्यासोबत मोर्चामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. काही विपरीत घडू नये म्हणून या मोर्चावर बारीक नजर ते ठेवून होते. मोर्चासाठी १८०० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
तसेच सर्वत्र ड्रोनची नजर होती. अठराशे पोलीस बंदोबस्तात असताना पोलीस दलाचा प्रमुख घरी कसा राहील? पोलिसांचं मनोबल उंचावण्यासाठी त्यांचा सेनापती देखील थेट मैदानात होता. नुसतं मैदानात हजेरी लावली नाही तर मोर्चा संपेपर्यंत प्रत्यक्ष मोर्चात सहभागी होत थेट नजर होती. फणसाळकर यांच्या या सेवावृतीच, त्याच बरोबर प्रत्यक्ष मैदानात उतरत कर्मचाऱ्यांना जो संदेश दिला. तो लाख मोलाचा आहे.
