मुंबई :
17 डिसेंबर(प्रतिनिधी)
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर काही दिवसांपूर्वी शाईफेक झाली होती. अचानक घडलेल्या या प्रकरणाचा चंद्रकांत पाटील यांनी चांगलाच धसकाच घेतल्याचं आज स्पष्ट झालं. आज पिंपरी चिंचवडच्या सांगवी येथील एका कार्यक्रमात मंत्री पाटील यांनी आपला चेहरा चक्क फेसशिल्डने कव्हर केला.
आपल्यावर पुन्हा शाई हल्ला झाल्यास त्यातून चेहऱ्यावर शाई पडू नये तसेच डोळ्यास इजा होऊ नये, याची खबरदारी म्हणून पाटील यांनी चेहऱ्यावर फेस मास्क लावले जात असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान मंत्री पाटील यांनी फेसशिल्ड घातल्याचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फेस शिल्डवर पाटील म्हणाले…
एखाद्याला शाई फेकून आनंद मिळत असेल तर चांगले आहे. सर्वांना प्रश्न पडेल की फेस शिल्ड घाबरून घालून आलेत का? मी घाबरत नाही, एखाद्याला शाई फेकून आनंद मिळतो पण माझे कार्यकर्ते आणि पोलीस काय झोपलेले नाहीत असे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
