मुंबई, दि. 19 डिसेंबर (प्रतिनिधी) : मुंबईच्या ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये तीनजण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या गोदरेज रुग्णालयात दाखल केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक कार मुंबईहून ठाण्याकडं जात होती. दुसऱ्या बाजूनं एक आलिशान कार ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं जात होती. त्याचवेळी मुंबईहून ठाण्याकडं जाणाऱ्या कारने दुभाजक तोडून पुलाच्या पलिकडून जाणार्या कारला धडक दिली. यामुळं हा अपघात झाल्याची माहिती आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय. दुभाजक तोडून दुसरीकडं गेलेल्या कारचंही नुकसान झालं असून त्यात बसलेले तीनजण गंभीर जखमी झालेत. घटनास्थळी उपस्थित लोकांनी पोलिसांच्या मदतीनं तिनही जखमींना रुग्णालयात दाखल केलंय. सध्या विक्रोळी पोलीस अपघाताचं नेमक्या कारणाचा तपास करत आहेत.
विक्रोळीच्या नारायण गोदे उड्डाण पुलावर कार दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेला गेल्यानं दुसऱ्या वाहनाला धडकली. या भीषण अपघातात एकूण तीनजण जखमी तर एक जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
