ठाणे दि.24 : राष्ट्रीय ग्राहक दिनांचे औचित्य साधून ग्राहकांना देण्यात आलेल्या अधिकारांचे आणि हक्कांचे संरक्षण व्हावे. यासाठी मानके व उत्पादनांचे या विषयावर प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे करण्यात आले होते.यावेळी ठाणे सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी विजय पाटील, ब्युरो ऑफ इंडियन स्टॅडर्डचे तुषार शर्मा,अषी वाकडे,जिल्हातील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री.पाटील म्हणाले की,ग्राहकांना हक्कांची जाणीव व्हावी आणि तो बाजारात खरेदीच्या हक्कांबाबत सक्षम व्हावा, यासाठी 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. हक्कांचा उपयोग करुन ग्राहक हित जोपासणारी व्यवस्था निर्माण होण्याच्यादृष्टीने सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. हक्कांचा उपयोग करुन ग्राहक हित जोपासणारी व्यवस्था निर्माण होण्याच्यादृष्टीने सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने ग्राहक हा ‘राजा’ होऊ शकेल. कोणतीही वस्तू आपण खरेदी केली तर ती भारतीय मानक आहे की, नाही हे तपासून घ्यावे. सुरक्षेच्या व आरोग्याच्या दृष्टिने आपण सर्वानी जागरुक राहिले पाहिजे .भारतीय मानका बदल जागरुकता आपल्या असली पाहिले असे यावेळी श्री.पाटील यांनी नमुद केले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री.शर्मा म्हणाले की,ग्राहक संरक्षण कायद्यामुळे सर्व ग्राहकांना सुरक्षेचा अधिकार, उत्पादनाबाबतच्या माहितीचा अधिकार, निवडीचा अधिकार, तक्रार निवारणाचा अधिकार आणि ग्राहक शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे. या आधारे एखाद्या उत्पादन सेवेबाबत जाणून घेणे त्याबाबत तक्रार असल्यास त्याचे निरसन करुन घेण्याचा हक्क नागरिकांना मिळतो.सुरक्षेचा हक्क,माहितीचा हक्क,तक्रार व निवारण करून घेण्याचा हक्क, ग्राहकांना मदत,या विषयावर माहीती दिली.ग्राहकांना येणाऱ्या अडचणी, तक्रारींबाबत हेल्पलाइनवरुन मार्गदर्शन करण्यात येते. ग्राहकांनी विकत घेतलेल्या वस्तू किंवा सेवांमध्ये काही त्रुटी असतील, त्याबाबत कुठे तक्रार करावी, त्याची नेमकी प्रक्रिया काय आहे, याची सर्व माहिती श्री.शर्मा यांनी दिली.
