ठाणे, दि. 6 – पत्रकार दिनानिमित्त आज ठाणे जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी प्र.जिल्हा माहिती अधिकारी नंदकुमार वाघमारे यांच्यासह, जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी तसेच इंडसइन्ड बँकेचे अधिकारी आशिष माने व निजर बोमा उपस्थित होते.
