ठाणे, दि. 12 जाने (प्रतिनिधी) : क्रांतिकारी,बुद्धिनिष्ठ, युगपरिवर्तनकारी, राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती समता मानव सेवा संस्थेच्या वतीने कार्यालय ठाणे येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रथम महिलांचा मानसन्मान म्हणून मनीषा बेलोस यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आली.पुढे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जीवन चरित्र पुस्तकाचे वाचन संस्थेचे प्रदेश उपाध्यक्ष सिध्दांत चासकर यांनी केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धनाजी सुरोसे यांनी जिजाऊ वंदना घेतली.त्यानंतर राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जीवनावर बोलताना म्हणाले की, ज्यावेळी शहाजीराजे राजमाता जिजाऊ यांना सोडून गेले म्हणजे मृत्यु पावले त्यावेळी सती जाण्याची प्रथा होती, ती मोडून त्याकठीण प्रसंगी जीवन जगण्याचा निर्धार केला. त्यावेळेस शिवबा अगदी फक्त सहा वर्षाचे होते. ती जबाबदारी स्वीकारून त्यांना स्वतः पूर्ण क्षेत्रातलं शिक्षण दिलं आणि त्याच ताकतीच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले. हे कार्य देशासाठीच नाही तर परदेशात सुध्दा इतिहास गाजत आहे. अश्या पराक्रमी, बुद्धिजीवी, हुशार, निर्धार व्यक्ती महत्त्व आपल्या घरा घरात जन्माला यायला हवे, परंतु आपलं उलटच असतं शिवबा सारखे जन्माला आले पाहिजेत पण माझ्या घरात नको शेजाऱ्याच्या घरात अशी वृत्ती आपण सोडली पाहिजे ही जाणीव महिला वर्गात होणे काळाची गरज आहे.म्हणतात ना जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा महिमा उध्दार करी. संस्थेच्या माध्यमातून कार्यक्रमात नेहमीच ज्या महापुरुषांनी बहुजनांच्या हितासाठी आपले सर्वस्व जीवन त्यागले त्या त्या महापुरुष, महामातांचे विचार पुस्तकेरुपी देण्याचे काम करीतच आहे. तरी भविष्यात सर्वांनी जास्तीत जास्त प्रचार, प्रसार व्हावा असे आव्हान ही सुरोसे यांनी केले.कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत संस्थेच्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थित सामाजिक परिवर्तन चळवळीचे कार्यकर्ते मा. कुणाल बागुल, संस्थेच्या महिला प्रदेशाध्यक्षा मनीषा बेलोसे, ठाणे उपाध्यक्ष अशोक देवकर, अफाक अन्सारी,सचिव सचिन यादव, भारत साळवे, विनोद देशमुख, विष्णू माने, संजय हुळे, बाळकृष्ण भागवत आदी उपस्थित होते. शेवटी संस्थेचे कार्याध्यक्ष संजय गुरव यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
