ठाणे, दि.१२ :- देशाच्या राजकारणातील थोर नेतृत्व, स्वातंत्र्य सेनानी, लेखक, महाराष्ट्राच्या विकासासाठी झटणारे राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांची जयंती आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
