ठाणे, दि.21 :- जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी “एक मेसेज व्हॉट्सॲपचा.. तुमच्या समाधानाचा…” या उपक्रमाचा प्रभावीपणे वापर करून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पाऊल उचलले आहे. 9930001185 हा तो व्हॉट्सअॅप क्रमांक असून नागरिकांना या क्रमांकावर आपली तक्रार नोंदविता येणार आहे.
भारताच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनी दि.15 ऑगस्ट 2025 रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नागरिकांच्या तक्रार व अडीअडचणी तात्काळ सोडविण्यासाठी व्हॉट्सअॅप नंबर तक्रार निवारण उपक्रमाचे अनावरण उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
तरी, जिल्ह्यातील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.
