Oplus_16908288
मुंबई, दि. २२ सप्टेंबर २०२५ : कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई यांच्या वतीने गुरुवार, दि. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबई आझाद मैदान येथे होणाऱ्या “कुणबी एल्गार मोर्चा” संदर्भात समाजोन्नती संघ, मुंबई आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने बुधवार दि. २४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २.३० वा. मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन, आझाद मैदान जवळ, मुंबई येथे ओबीसी आरक्षण बचावासाठी कुणबी एल्गार मोर्चा बाबत पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. तरी सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, प्रिंट मिडिया इलेक्ट्रॉनिक आणि मिडिया यांनी उपस्थित राहावे, यासाठी हृदयपूर्वक निमंत्रीत करत आहोत.
आपला नम्र,
(कृष्णा विश्राम वणे) सरचिटणीस-कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई
