ठाणे, दि.19 :- यावर्षी अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह महाराष्ट्र राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना मदत करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र शासनासह विविध संस्था, व्यक्ती पुढे सरसावले आहेत. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयही या मदतकार्यात क्यू आर कोडच्या माध्यमातून पुढे सरसावले आहे.
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रुपाली भालके, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सर्जेराव मस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शशिकांत गायकवाड, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नितीन पाटील, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, तहसिलदार रेवण लेंभे, सचिन चौधर, संदीप थोरात, अमोल कदम, प्रदिप कुडाळ, उज्वला भगत, निलेश गौड, मुकेश पाटील, जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुले यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी कार्यालय आणि सर्व प्रांत व तहसिल कार्यालय यांनी दिवाळी फराळ कार्यक्रमासोबतच “एक हात पूरग्रस्तांच्या मदतीकरिता” याअंतर्गत “माणूसकीची दिवाळी” हा उपक्रम राबविला. यावेळी अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी “मुख्यमंत्री सहायता निधी” कक्षाच्या बँक खात्यावर क्यू आर कोडच्या माध्यमातून स्वेच्छा निधी थेट जमा केला. पहिल्याच दिवशी हा निधी जवळपास एक लाख रुपयांच्या आसपास पोहोचला. शासन आणि प्रशासन हे नेहमीच नागरिकांच्या कल्याणाकरिता अहोरात्र प्रयत्न करीत असते, त्यासाठी हे देखील कर्तव्य आणि माणुसकीच्या भावनेतून केलेले एक छोटेसे योगदान असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी म्हटले.
Categories
- Arogya
- kalyan
- Mohali
- अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
- अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
- अमरावती
- अर्थकारण
- अलिबाग
- अल्पसंख्पाक विभाग
- अहमदनगर
- अहमदाबाद
- आंतरराष्ट्रिय
- आंतरराष्ट्रीय
- आंध्रप्रदेश
- आरोग्य
- इजिप्त
- उच्च व तंञ शिक्षण विभाग
- उत्तर प्रदेश
- उद्योग
- औरंगाबाद
- कल्याण
- कृषी विभाग
- कोकण भवन
- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग”
- क्राईम
- क्रीडा
- क्रीडाविश्व
- खेड
- गडचिरोली
- गृह खाते
- गृहनिर्माण खाते
- चिपळूण
- चेन्नई
- छत्रपती संभाजी नगर
- जनजागृती
- जयपूर
- जल वाहतुक
- जल विभाग
- जामनगर
- जालना
- जैसलमेर
- झिम्बाब्वे
- ठाणे
- डोंबिवली
- ताज्या बातम्या
- दापोली
- दावोस
- दुर्ग
- नगरविकास
- नवी दिल्ली
- नवी मुंबई
- नागपूर
- नागालँड
- नाटक
- नाशिक
- पंढरपूर
- परिवहन
- पर्यटण
- पर्यटन
- पर्यावरण
- पालघर
- पिंपरी
- पुणे
- पुनर्वसन
- पोलंड
- प्रशासन
- फिलिपिन्स
- फेसबुक
- बीड
- बुलढाणा
- भारत
- भिवंडी
- भोपाळ
- मंञी मंडळ निर्णय
- मंञीमंडळ बैठक निर्णय
- मदत व पुनर्वसन
- मनोरंजन
- महसुल
- महाराष्ट्र
- महिला बचत गट
- महिला व बाल विकास
- माहिती आणि जनसंपर्क विभाग
- मुंबई
- रत्नागिरी
- रस्ते व महामार्ग विभाग
- राजकारण
- राजस्थान
- राज्य उत्पादन शुल्क विभाग
- रायगड
- राष्ट्रीय
- रोजगार
- रोहा
- लसीकरण
- वन संपदा
- वाहतुक पोलिस
- वाहतुक विभाग
- विज विभाग
- विधीसेवा
- विशेष
- वैद्यकीय
- शहापूर
- शालेय शिक्षण
- शिक्षण
- शिक्षा
- शिधा वाटप विभाग
- शेती
- सण-संस्कृती
- समाजकल्याण
- साऊथ
- सांगली
- सामाजिक
- सामान्य प्रशासन
- सार्वजनिक बांधकाम
- सांस्कृतिक
- साहित्य
- सिने वल्ड
- सिनेवार्ता
- सोलापूर
- स्मार्ट सिटी प्रोजेक्ट
- हवामान खाते
- हेल्थ
