मुरबाडमधील दुर्गम कोल्हेवाडी वस्तीत 40 कुटुंबीयांना फराळ, महिलांना साड्या वाटप
ठाणे, दि. 20 ऑक्टोबर : “दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी…” असे पारंपारिक गाणे ऐकले की या गाण्यातील कोणत्या प्राण्याशी साधर्म्य असेल, असा प्रश्न पडतो. पण गुलाबी थंडीत निमूटपणाने अंगाला उटणे, तेल लावून भल्या पहाटे साडे सहा वाजता आंघोळीला जावे लागत होते. अलिकडे मात्र दिवाळीची ‘रम्य’ पहाट सहा वाजताच सुरू होताना दिसते. पूर्वी बालपणी आई अगदी ‘भल्या’ पहाटे उठवायची. चार वाजताच उठून आईने दारातील कंदिलात दिवा लावलेला असायचा. दारात रांगोळी काढायची आणि स्वतःची अन् पोरा-टोरांची दिवाळीची कास अंघोळ उरकायची. अंघोळी सरु असताना बाथरूमच्या दारात ताई एखादी फुलबाजी लावायची. घरात बाबांनी “आकाशवाणीचे पुणे केंद्र”, सुरु केलेलं असायचे. त्यावर आधी बिस्मिल्ला खांसाहेबांच्या शेहनाईचे सूरही घर भरून टाकायचे. नंतर नरकासुराच्या वधाचे किर्तन हमखास लागायचे. ती दिवाळी कधीच मागे सरली. आता मध्यरात्री घराची तावदाने हलावीत असा दणकेबाज बॉम्ब कोणीतरी फोडतो. कोणीतरी पलिकडच्या चौकात हजार दोन हजारांची माळ दणदणाटात पेटवलेली असते. जाग येते तीच आसमंतातील जळक्या दारूच्या दर्पाने. आजही माई दाराशी रांगोळी रेखते. पण त्यासाठी तिला एखाद्या लहान पाटाचा आसरा घ्यावा लागतो. आजही ती पारंपारिक दिपवाळीचे गाणे गुणगुणते पण “आकाशवाणी पुणे केंद्रा”वरून लागणारी शेहनाई आणि नरकासुराचे आख्यान आता कामी पडत नाही. कारण रेडिओच कालबाह्य झाला आहे. बदलत्या दिवाळीचे स्वागत व्हर्च्युअली येणाऱ्या कंदिलांच्या आणि फराळाच्या व्हाटसप संदेशांनीच होते. एकमेकांना भेटून बोलून प्रत्यक्षात शुभेच्छा द्याव्यात असे वाटते खरे. पण आपण तरी कुठे त्या दिशेने प्रयत्न करतो!! करायला हवेत. दिवाळीची पहाट संपर्काने, संवादाने, हास्य विनोदाने, खेळीमेळीने व्हायला हवी. सर्व मित्रांना शुभ दीपावली भेटून म्हणूया. सकाळीच घराबाहेर पडू. पण प्रत्यक्षात ते किती जमेल, ते मात्र माहिती नाही…!! हे पुन्हा व्हायला हवे… असं वाटणारी हाताच्या बोटे मोजण्याइतकी माणसे मिळतील. त्या हातातील एक म्हणजेच राजे संस्कार प्रतिष्ठान. मदतीचा हात कुठेही, केव्हाही. समाजसेवा ठासून भरलेली संस्था असा नावलौकीक. असे समाजसेवेचे वेड असाव लागत,
राजे संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. संभाजी शेळके यांना ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील कोल्हेवाडी गावातील आदिवासी दिवाळी सनापासून वंचित असल्याची माहिती संस्थेचे शुभचिंतक संजय इदे यांनी हाक दिली. अभ्यंगस्नान, नरकचतुर्दशी. सगळीकडे आनंदी आनंद, रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी होत असताना. ठाणे शहरालगत असणाऱ्या अनेक आदिवासी पाडे वस्त्यांमध्ये आजही दिवाळी सण गरिबीमुळे साजरा होत नाही. तेथे ना रांगोळी, ना लाडू चिवडा – करंजी अशा या आदिवासी वस्त्यां-पाड्यांपर्यंत ठाण्यातील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील प्राध्यापक व राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी शेळके याचे मागर्शनाखाली आज दिपावली साजरी केली.
राजे संस्कार प्रतिष्ठानने मुरबाड तालुक्यातील कोल्हेवाडी येथील आदिवासी कातकरी वस्तीतील ४० कुटुंबीयांना राजे संस्कार प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने चार्टर्ड अकाउंटंट मंदार आणि वैदेही गाडगीळ यांच्या सहकार्याने आणि गुरूवर्य सुकांत देशपांडे आणि श्रीमती हेमांगी गाडगीळ यांच्या हस्ते दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप करून दिवाळीचा सण गोड करण्यात आला. त्याचप्रमाणे आदिवासी भगिनींना साड्या व लहान मुलांसाठी खाऊचे वाटपही करण्यात आले. त्यात संजय ईदे सर, रवींद्र चंदणे यांचाही सहभाग होता.
