Oplus_16908288
मुंबई, दि. 31 ऑक्टोबर (प्रतिनिधी-अनुराग पवार) :
बावनकुळे साहेब मग ज्या शासकीय कर्मचाऱ्यांना गरज आहे. त्यांनाच ८ वा वेतन आयोग लागू करावा, जर नवरा बायको शासकीय कर्मचारी असले तर बायको पण घेणार ८ वेतन आयोग आणि नवरा पण घेणार ८ वा वेतन आयोग हे तुम्हाला चालू शकते.. परत हे निवृत्त झाले तर बायको पण निवृती वेतन घेणार नवरा पण निवृती वेतन घेणार, मग येथे पण गरज असेल तर निवृत्ती वेतन द्या.
सरकारने भेदभाव करू नये कर्ज माफी द्यावी. ती सरसकट द्यावी अनेक डबेवाले आपली गावची शेती करून मुंबईत डबे पोहचवण्याचे काम करतात कारण शेतीच्या उत्पनात काही भागत नाही या वर्षी तर पाऊस सहा महीने झाले अजून तो पडत आहे.
मावळात भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापनीला आलेले भात पाण्यात आडवे पडले आहे. हाता तोंडाशी आलेले पिक वाया गेले, तेव्हा सरकारने सरसकट कर्ज माफी करावी अशी विनंती मुबंई डबेवाले असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांचे मत आहे..
