ठाणे, दि.१२ : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती द सोच छावणी या तीन दिवसीय युवा शिबिराचे आयोजन दि. १५, १६ व १७ मे २०२६ रोजी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्वहारा परिवर्तन केंद्र, पहिने (चिखलवाडी) येथे करण्यात आले आहे.
“वैज्ञानिक, आशावादी, सर्जनशील, मानवतावादी” या संकल्पनेवर आधारित या छावणीचा उद्देश तरुणांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशुद्ध विचार आणि मानवतावादी मूल्यांची जाणीव निर्माण करणे हा आहे.
या छावणीत हेरंब कुलकर्णी, राम पुनियानी, डॉ. नितीन शिंदे, विनायक सावळे आणि डॉ. अपर्णा अष्टपुत्रे यांचे विविध विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. तसेच समूहचर्चा, सांस्कृतिक उपक्रम आणि मैत्रीपूर्ण वातावरणातून तरुणांना वैचारिक व सामाजिक अनुभव मिळणार आहेत.
१८ ते ३० वयोगटातील तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रियांका – ८६५२६१७३८२ आणि हरी – ७७०९१२०१२९ यांच्याशी संपर्क साधावा.
