ठाणे दि. 18 (जिमाका) :- भिवंडी शहरात दि.19 ऑक्टोबर 2021 रोजी (चंद्र दर्शनानुसार एक दिवस मागे किंवा पुढे) “ईद-ए-मिलाद” साजरी होणार आहे. सदर दिवशी मिरवणूक काढण्यात येते. या कालावधीत भिवंडी शहरातील वाहतूक सुरळीत रहावी. यासाठी बाळासाहेब पाटील उप आयुक्त, वाहतूक शाखा, ठाणे शहर यांनी भिवंडी शहरात वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे.
प्रवेश बंद वाडा रोड मार्गे भिवंडी शहराकडे येणा-या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना अंबाडी नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग सदरची जड अवजड वाहने ही अंबाड़ी नाका येथून राष्ट्रीय महामार्ग क्र. 8 ने अथवा बृहन्मुंबई महानगरपालिका पाईपलाईन मार्गे जातील.
प्रवेश बंद वाडा रोडने नदीनाका मार्गे भिवंडी शहराकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पारोळ फाटा(नदीनाका) येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग सदरची हलकी वाहने परोळ फाटा येथून उजवीकडे वळून खोणीगाव, तळवली फाटा, काबारोड मार्गे वसई रोड येथून डावीकडे वळण घेवून कारीवली मार्गे अथवा विश्वभारती फाटा येथून डावीकडे वळन घेवून गोरसईगाव मार्गे इच्छित स्थळी जातील,
प्रवेश बंद वडपा चेकपोस्ट मार्गे भिवंडी शहराकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना एस. टी. बसेससह धामणगांव, जांबोळी पाईपलाईन नाका व चाविद्रा नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग सदरची सर्व प्रकारची वाहने धामणगांव पाईपलाईन येथे उजवीकडे वळण घेवून पाईपलाईन मार्गे वाडयाकडे व पुढे इच्छित स्थळी जातील. तसेच एस. टी. बसेस आपले प्रवाशी चाविंद्रा जकात नाका या ठिकाणी उतरवतील व तेथून प्रवाशी घेवून बस वळवून इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद ठाणे, कल्याणकडुन जुना ठाणे आग्रा रोडने वाडा बाजूकडे व चाविंद्रा मार्गे नाशिकडे जाणा-या सर्व वाहनांना बागेफिरदोस मस्जिद पेट्रोल पंप येथे 'प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग सदरची वाहने बागेफिरदोस पेट्रोल पंप येथे उजवीकडे वळण घेवून खंडुपाडा रोडने इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद राजनोली चौकातून भिवंडी शहरात येणा-या एस.टी. के.डी.एम.टी. बसेस, जड अवजड वाहने, कार, रिक्षा, दुचाकी, मध्यम व हलकी वाहनांना राजनोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग सदरची एस.टी. के. डी. एम.टी. बसेस, रिक्षा या राजनोली नाका येथे प्रवाशी उतरवतील व तेथूनच प्रवाशी भरून इच्छित स्थळी जातील. तसेच जड-अवजड, मध्यम व हलकी वाहने राजनोली नाका येथूनच वळसा घेवून मुंबई नाशिक बायपास हायवे वरील मानकोली नाका येथून अंजुर फाटा किंवा वसई रोड किंवा ओवळी खिंड येथून ओवळी गाव, ताडाळी जकात नाका, कामतघर किंवा पाईपलाईन रोडने इच्छित स्थळी जातील.
नो-पार्किंग झोन कॉटरगेट मस्जिद-रामभवन हॉल-चाँदतारा मस्जिद, बुबेरे हॉटेल-पटेल मस्जिद उजव्या बाजुने पांजरपोल चौक मार्गे उजव्या बाजूस वळून पंडीत जवाहरलाल चौक (वंजारपाटी नाका)-ममता हॉस्पीटलच्या बाजूने डावीकडे मामा भांजा दर्गा पावेतो या मिरवणूक मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूस सर्व प्रकारच्या वाहनांना वाहने पार्क करण्यास मनाई करण्यात येत आहे.
सदरची अधिसूचना हि "ईद-ए-मिलाद" या दिवशी दि. 19 ऑक्टोबर 2021 रोजी (चंद्र दर्शनानुसार एक दिवस मागे किंवा पुढे) दुपारी 02.00 ते रात्री 10.00 वाजे पावेतो अमलात राहील. सदरची वाहतुक नियंत्रण अधिसूचना ही पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे पोलीस उप आयुक्त, वाहतूक शाखा, ठाणे बाळासाहेब पाटील, यांनी कळविले आहे.

