ठाणे दि. 20 (जिमाका) :- ठाणे शहर वाहतूक विभागाअंतर्गत ठाणेनगर वाहतूक उपविभागाच्या हद्दीत उद्या दि. 21 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 08.00 वाजता स्वर्गीय निर्मलादेवी चिंतामण दिघे उद्यान, ठाणे येथे पोलीस स्मृति दिन साजरा होणार आहे. सदर कार्यक्रमाच्या वेळी ठाणे पोलीस स्कूल ते ठाणे विश्रामगृह पर्यंत रोड वाहतुकीस कार्यक्रम संपेपर्यंत ठाणे नगर वाहतूक उप विभागात नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे.प्रवेश बंद पोलीस स्कूल, खारकर आळी कडून कोर्टनाक्याकडे येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना पोलीस स्कूल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग सदरची वाहने पोलीस स्कुल चौकातून महाजनवाडी हॉल मार्गे एन.के.टी. कॉलेज कडे अथवा चित्रे टॉवर, जांभळी नाका मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद कोर्ट नाक्याकडून पोलीस स्कूल मार्गे जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना ठाणे विश्रामगृह येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग सदरची वाहने एन. के. टी. कॉलेज कडून महाजनवाडी हॉल मार्गे व पॅव्हिलीयन हॉटेल, ठाणे मध्यवर्ती
कारागृह मार्गे इच्छित स्थळी जातील.
सदरची वाहतूक अधिसूचना हि दि. 21 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी06.00 वा. ते पोलीस स्मृतिदिन कार्यक्रम संपेपर्यंत अंमलात राहील. असे पोलीस उप आयुक्त, वाहतूक विभाग, ठाणे शहर बाळासाहेब पाटील यांनी कळविले आहे.
