ठाणे दि.24 :- ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि. 31 डिसेंबर 2021 रोजी वर्षाअखेर (नुतन वर्ष आगमन), दि. 03 जानेवारी 2022 रोजी सावित्रीबाई फुले जयंती, महिला मुक्तिदिन, दि. 09 जानेवारी 2022 रोजी गुरु गोविंदसिंह जयंती असे सण / उत्सव संपन्न होणार आहेत यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्त, जय जीत सिंह यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मनाई आदेश जारी केले आहे. 26 डिसेंबर ते 9 जानेवारी 2022 या कालावधीत हे मनाई आदेश आहे.
हे मनाई आदेश खालील व्यक्तींना लागू राहणार नाहीत. जो कोणी इसम सरकारी नोकर आहे, किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याने सुट दिलेली आहे.
सदर आदेश खालील मिरवणुका व जमावास लागू राहणार नाहीत. लग्न कार्यासाठी जमलेले लोक. प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका. सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेऱ्या येथे जमलेले लोक. सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय, पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/ मिरवणुका, सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण.
सदर मनाई आदेश दिनांक 26 डिसेंबर 2021 रोजी 00.01 वाजेपासून दिनांक 09 जानेवारी 2022 रोजी 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. वरील मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 135 प्रमाणे कारवाई करण्यात येईल. असे ठाणे शहर पोलीस आयुक्त जय जीत सिंह यांनी कळविले आहे.
