ठाणे, दि.28 : ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील उमेदवारांसाठी दिनांक 29 व 30 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त कविता जावळे यांनी कळविले आहे.
उमेदवारांनी नोंदणीसाठी www.ncs.gov.in या पोर्टलवर जॉबसिकर म्हणून नोंदणी करावी. नंतर जॉब फेअर व इव्हेंट टॅब मधिल ऑनलाईन जॉब फेअर या टॅबवर क्लिक करावे व उपलब्ध असलेल्या रिक्तपदाची माहिती पाहून ऑप्शनवर क्लिक करावे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या ०२२-२५४२८३०० या दूरध्वनीवर संपर्क साधावा,असे आवाहन श्रीमती जावळे यांनी केले आहे.

