मुंबई-पुनित खांडेकर (प्रतिनिधी) दि.२८ डिसेंम्बर २०२१ रोजी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तळाच्या वतीने सन २०२२ चा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा वाघे सभागृह, परेल, मुंबई येथे कुणबी समाज बांधवांच्या प्रचंड उपस्थितीत संपन्न झाला.
सदर सोहळा हा तालुका शाखेचे सन्मानिय अध्यक्ष सुरेश कावकर यांच्या शुभ हस्ते व मुख्य संघाचे ऊपाध्यक्ष हरिचंद्र म्हातले, सहसचिव अशोक कंरजे तसेच उद्योजक जयराजशेठ लोखंडे, संघ प्रतिनिधि शाखेचे माजी अध्यक्ष जनार्दन शिगवण, कुणबी युवा तळाचे ऊपाध्यक्ष गणेश ठमके, खजिनदार भरत नाडकर इत्यादी मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितित महामानवांच्या आणि समाजनेते यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण व दिपप्रज्वलन करून कुणबी दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
दिनदर्शिका समिती प्रमुख सुनिल जाईलकर यांनी प्रस्तावना केली. प्रस्थावनेत दिनदर्शिकेची ठळक वैशिष्ट्ये सांगत असतांना त्यात अत्यावशक संपर्क क्रमांक, व्यावसायिकांच्या जाहिराती, कुणबी युवाच्या विविध विभागांचे संपर्क क्रमांक असल्याचे त्यांनी नमूद केले. समयी संघ उपाध्यक्ष हरिचंद्र म्हातले सहसचिव अशोक कंरजे तसेच शाखा अध्यक्ष सुरेश कावणकर यांनी मार्गदर्शनपर शुभेच्छा तसेच अल्पावधीत दिनदर्शिका तयार करण्यासाठी दिनदर्शिका समिती व सहसचिव यांनी खूप मोलाचे योगदान दिल्याबद्दल त्यांचेही विशेष कौतुक करण्यात आले.
सदर कार्यक्रमास कुणबी युवा वर्ग तसेच ग्रामस्थ म़डळांचे पदाधिकारी, गाव प्रतिनिधी जाहिरातदार व हितचिंतक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिति होती सोहळा संपन्न करण्यासाठी दिनदर्शिका समिती, शाखा पदाधिकारी, सदस्य, युवापदाधिकारी, युवा वर्ग गावप्रतिनिधी यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सचिव विनय धाडवे तसेच आभार प्रदर्शन उपाध्यक्ष यशवंत शिंदे यानी केले. शासनाने नमूद केलेल्या नियमानुसार हा कार्यक्रम संपन्न सपंन्न झाला .

तळा दिनदर्शिका २०२२ सोहळा
