पालगड, दापोली १० जाने. मोहन म्हापार्ले (प्रतिनिधी)-कुणबी समजुन्नती संघ-शाखा तालुका दापोली, गट पालगड मुद्रित कुणबी दिनदर्शिका-२०२२ चा प्रकाशन व वितरण सोहळा रविवार, दि. ९ जानेवारी २०२२ रोजी शिरसाडी-विट्ठल रखुमाई मंदिर दुपारी २ वाजता अध्यक्ष मा. श्री. शरद भावे साहेब, मा. श्री. संदीपजी राजपुरे साहेब, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-श्री. विष्णू डिके व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते उपस्थितीत उत्स्फूर्तपणे संपन्न झाला. तरी या प्रकाशन सोहळ्यास खालील पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्री. संदीप राजपुरे साहेब (सरचिटणीस) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, श्री.शरद भावे (अध्यक्ष) कुणबी समजुन्नती संघ-दापोली तालुका-पालगड (मुंबई), श्री. दिपक गोरीवले (माजी ग्रामीण अध्यक्ष) कुणबी समजुन्नती संघ-दापोली, श्री. विष्णू डिके (संस्थापक अध्यक्ष) पालगड गट मुंबई, श्री.किशोर चौगुले (कार्याध्यक्ष) पालगड गट ग्रामीण, श्री. महेंद्र चव्हाण (सचिव)-पालगड गट ग्रामीण, श्री.केशव भुवड (माजी पोलीस पाटील) शिरसाडी, श्री. दत्ताराम ठोंबरे (उपाध्यक्ष) पालगड गट मुंबई, श्री. नारायण काटकर (उपाध्यक्ष) पालगड गट मुंबई, श्री.संदीप कदम (खजिनदार) पालगड गट मुंबई, श्री.अनुज चव्हाण (सहसचिव) पालगड गट मुंबई, सौ. दिपाली भुवड (अध्यक्ष) महिला मंडळ, शिरसाडी
सर्व समाजबांधव तसेच बंधू-भगिनी, सन्मानीय जाहिरातदार व देणगीदाराचे आभार !
Related Stories
December 10, 2022





