दापोली :- तालुक्यातील ६ जिल्हा परिषद गटांसाठी २४ तर १२ पंचायत समिती गणांसाठी ५६ उमेदवारी अर्ज निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले असून उबाठाचे कोळबांद्रे जिल्हा परिषद गटातील अधिकृत उमेदवारी कमलाकर आंग्रे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविल्याने उबाठाला मोठा धक्का बसला आहे.
जिल्हा परिषद केळशी नरेंद्र करमरकर – उबाठा, गुणाजी गावणुक – उबाठा, जितेंद्र जाधव – बसपा, नितीन दुर्गवळे – शिवसेना, प्रसाद पाटेकर – अपक्ष, श्रीकांत मुगंशे – काँग्रेस, मकरंद म्हादलेकर – भाजपा, पालगड शुभांगी खोचरे – उबाठा, नेहा जाधव – राष्ट्रवादी, मिनाक्षी शेडगे – शिवसेना, हर्णै शितल जाधव – राष्ट्रवादी, ऐश्वर्या धाडवे – शिवसेना, जालगांव श्रीराम इदाते – अपक्ष, किशोर देसाई – शिवसेना, अक्षय फाटक – भाजपा, मिनल भाटकर – उबाठा, विकास मेहता – अपक्ष, कोळबांद्रे सलीम खोत – काँग्रेस, प्रभाकर गोलांबडे – शिवसेना, राजाराम रसाळ – उबाठा, दाभोळ स्मिता जावकर – भाजपा, नम्रता तोडणकर – शिवसेना, रत्ना बहिरमकर – उबाठा, साधना महाजन – शिवसेना,
पंचायत समिती केळशी संदीप चिखले – शिवसेना, दिनेश मालप – उबाठा, महेंद्र रेवाळे व तुषार रांगले – राष्ट्रवादी, जुईकर मोहल्ला मिलिंद खैरे – अपक्ष, संतोष जगदाळे – अपक्ष, जितेंद्र जाधव – बसपा, सुरेश झिमण – अपक्ष, अजिंक्य दळवी – भाजपा, रविंद्र धाडवे – उबाठा, रविंद्र मांडवकर – अपक्ष, उन्मेष राजे – शिवसेना, विनोद लयाळ – अपक्ष, पालगड अवधुत कदम – अपक्ष, रमेश चव्हाण – उबाठा, गणेश निवळकर – अपक्ष, संदीप पवार – बसपा, राजेंद्र फणसे – शिवसेना, रमा बेलोसे व सुशांत बेलोसे – राष्ट्रवादी, जनार्दन हळदे – उबाठा, खेर्डी शुभांगी खोचरे – उबाठा, साक्षी गोलांबडे – शिवसेना, ॲड. अक्षता जाधव – उबाठा, सुचिता महाडीक – शिवसेना, गिम्हवणे – आर्वा आरेकर – भाजपा, सुवर्णा खळे – शिवसेना, अस्मिता बांद्रे – उबाठा, कावेरी माने – राष्ट्रवादी, हर्णै आशा जाधव – शिवसेना, तुळसा जाधव – राष्ट्रवादी, विद्या वासावे – भाजपा, जालगांव श्रीराम इदाते – भाजपा, मंगेश पवार – शिवसेना, शैलेश पांगत – उबाठा, अक्षय फाटक – अपक्ष, मंगेश मोरे – काँग्रेस, विकास लिंगावळे-अपक्ष, टेटवली रविंद्र घडवले – उबाठा, अमित तांबे – राष्ट्रवादी, निलेश शेठ – शिवसेना, कोळबांद्रे श्रावणी कदम – भाजपा, रत्ना बहिरमकर – उबाठा, ममता शिंदे – शिवसेना, पांगारी तर्फे हवेली नरेश घरटकर – शिवसेना, प्रकाश मोरे – बसपा, संजय रामाणे व मुजीब रूमाणे – उबाठा, बुरोंडी अंकिता घुबडे – शिवसेना, पुनम पांदे – भाजपा, स्वप्नाली साठे – भाजपा, दाभोळ – सारिका उजाळ- राष्ट्रवादी, फरिदा खान – उबाठा, नम्रता तोडणकर, संध्या पालकर – शिवसेना, अनुष्का महाडीक-मनसे असे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दि. २३, २४ व २७ जानेवारी हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखा असून यामध्ये युती होणार की महायुती किंवा महाआघाडी होणार हे समजणार असून त्यानंतरच प्रचाराचा धुरळा मोठया प्रमाणात तालुक्यात उडणार आहे.
