दापोली, दि. 10 डिसेंबर :- तालुक्यातील ३० ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सरपंचपदासाठी ५३ उमेदवाराचा रिंगणात आहेत तर सरपंचपदासाठी ५३ उमेदवार रिंगणात ९ ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. तर सदस्यपदासाठी ७६ उमेदवार रिंगणात असून १८४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या जालगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी ५ उमेदवार रिंगणात आहेत.
सरपंच आले आहेत. सदस्य वासुन १८४ दिन आले तालुक्यातील मोठी आमचा असलेल जलगाव मातीच्या पदासाठी उमेदवार रिंगणात आहेत.
३० ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी सरपंचपदासाठी ८५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. छाननीत सर्व अर्ज वैध ठरले होते. त्यात २३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून ५३ अर्ज शिल्लक होते. त्यात ९ सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये दमामे, देगाव, टाळसुरे, बोंडीवली, भडवळे, विरसई, शिरसाडी सारंग, सोवेली या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ३० ग्रामपंचायतींच्या ९३ प्रभागात २३२ सदस्य निवडून द्यायचे होते. त्यासाठी ३०५ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. ते सर्व वैध ठरले असून ४५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे १८४ जागी सदस्य बिनविरोध निवडून आले असून ७६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १७ ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य बिनविरोधत निवडून आले आहेत. यामध्ये आगरवायंगणी, कादिवली, करंजाणी, कोळबांद्रे, दमामे, देगाव, टाळसुरे, पाचवली बोंडीवली, भडवळे, विरसई, शिरसाडी, सडवे, सातेरेतर्फे नातू, सारंग, सोवेली, हातीप या गावांचा समावेश आहे.
