नवी मुंबई दि.25: सन 2021 च्या विभागीय स्पर्धात्मक परिक्षेचे प्रवेशपत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून दि.9 फेब्रुवारी 2022 पूर्वी स्विकारण्यात यावे.
कोकण विभागाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ सहाय्यक/भांडारपाल सहाय्यक/संगणक या पदावरील कर्मचाऱ्यांमधून वरिष्ठ सहाय्यक पदावर 25 टक्के निवडीने भरण्याकरीता मर्यादित स्पर्धात्मक विभागीय परिक्षा सन-2021 ही दि.9 फेब्रुवारी 2022 रोजी चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नवीन पनवेल ता.पनवेल जि.रायगड येथे करण्याचे प्रस्तावित आहे. या परिक्षेसाठीचे प्रवेशपत्र संबंधित कर्मचाऱ्यांनी त्या-त्या जिल्हयाच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून स्विकारावेत. याची सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी, असे कोकण विभागाचे महसूल आयुक्त विलास पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
