नवी मुंबई दि. 24 : राष्ट्रीय पर्यटन दिन 25 जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे. या वर्षाचे घोषवाक्य (थीम) “ग्रामीण आाणि समुदाय आधारित पर्यटन” असे आहे. यावर आधारित कोकण विभाग नवी मुंबई यांनी face book live webinar दि.25 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 4 वाजता आयोजित केली आहे.
या वेबीनार मध्ये प्रमुख प्रवक्ते विनावर्ल्ड तथा नॉर्थ कोकण चेंबर्स ऑफ कॉमर्स असोशीएशनचे अध्यक्ष सुधीर पाटील, अमृतवेज निसर्ग सहवासचे संचालक अनिल अमृते, जव्हार टुरिझम ॲड हॉस्पिटॅलिटी प्रा.लीचे संचालक वैभव घोलप यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
राष्ट्रीय पर्यटन दिनाच्या निमित्ताने “ग्रामीण आाणि समुदाय आधारित पर्यटन” फेसबुक लाईव्ह वेबीनारला उपस्थित राहण्यासाठी www.facebook.com/konkantourismregionaloffice या link वर क्लीक करून दि.25 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 4.00 वाजता सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन पर्यटन प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक हनुमंत हेडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

