ठाणे दि. 02 :- ठाणे येथील घोडबंदर रोड कडून ठाणे बाजुकडे जाणा-या रोडच्या कडेला उतरणीवर गायमुख घोडबंदर रोड ठाणे या ठिकाणी कोणत्यातरी शारिरीक आजाराने एक अनोळखी बेवारस इसम बेशुध्द अवस्थेत मिळून आल्याने त्यास औषधोपचाराकरिता शासकीय रुग्णालय, ठाणे येथे दाखल केरण्यासाठी नेले असता सदर इसमाचा मृत्यु झाला. मयत अनोळखी बेवारस इसमाची नोंद कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
मयत इसमाचे वर्णन :- पुरुष इसम वय अंदाजे 50 वर्षे वयोगटाचा, रंग-गहुवर्ण, दाढी मिशी वाढलेली काळी पांढरी, चेहरा-गोळ, अंगाने मजबूत, नाक सरळ, डोकीचे केस काळे, उंची अंदाजे 05 फुट, दोन्ही डोळे बंद, तोंड बंद, उभट चेहरा, उजव्या हातावर ओमचे त्रिशुल डमरू असे चित्र गोंदलेले, अंगात निळसर रंगाचा लायनिंगचा व गडद निळसर रंगाचा त्यावर गुलाबी रंगाची फुलाची डिझाईन असलेला हाफ शर्ट व राखाडी रंगाची पॅन्ट व चॉकलेटी रंगाची अंडरवियर घातलेला आहे.
अशा मयत इसमाचे जर कोणी नातेवाईक किंवा वारसदार असल्यास त्यांनी कासारवडवली पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कासार वडवली पोलीस स्टेशन, ठाणे यांनी केले आहे.
